44 व्या वर्षी बिग बींच्या मुलीचं अभिनयात पदार्पण
श्वेता बच्चन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतंच अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात श्वेता यांनी केलेल्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्वेता बच्चन नंदा 44 व्या वर्षी पदार्पण करत असल्याने आश्चर्य आणि उत्सुकता व्यक्त होत आहे. भाऊ अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये अनेक वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र श्वेता बच्चन बॉलिवूडपासून लांबच राहिल्या.
अमिताभ बच्चन हे 2012 पासून 'कल्याण ज्वेलर्स'ची जाहिरात करतात. पत्नी जया बच्चनसोबतही अमिताभ बच्चन या जाहिरातीत दिसले होते.
या जाहिरातीत अमिताभ बच्चन एका ज्येष्ठ नागरिकाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर श्वेताने सलवार-कमीज परिधान केल्याचं दिसतं.
बिग बी अमिताभ बच्चन आणि श्वेता बच्चन कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीत झळकणार आहेत. खुद्द अमिताभ बच्चन यांनीच त्याबाबतचा फोटो शेअर केला. कल्याण ज्वेलर्सची ही जाहिरात जुलैमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचं शूटिंग सोमवारी पूर्ण झालं.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येणार आहे. श्वेता 44 व्या वर्षी ग्लॅमरस इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. श्वेता कोणत्या सिनेमात नव्हे तर एका जाहिरातीत दिसणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -