सिंधुदुर्गातील श्री कुणकेश्वर चरणी 4000 देवगड हापूस आंब्यांची आरास
कुणकेश्वरमधील भगवान शंकराच्या पिंडीभोवती केलेली हापूस आंब्याची आकर्षकआरास पाहून पर्यटकांनाही प्रसन्न वाटतं आणि हापूसची चव चाखण्याचा मोहही आवरत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळ्याची सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातून पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. देवगडमध्येही पर्यटक कुणकेश्वर मंदिरात भेट देत आहेत.
सध्या कोकणात आंब्याचा सीजन आहे. मात्र हापूसवर वारंवर येणारी नैसर्गिक आपत्ती, हवामानाचा परिणाम तसंच देवगड हापूसचे अर्थकारण बदलावं आणि उत्पनात भरभराट व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर चरणी देवगड हापूस अर्पण केले आहेत.
देवगडमधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दैवत असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर चरणी 4000 हापूस आंब्याची आरास केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक शिवकालीन कुणकेश्वर मंदिरात, शंकराची पिंड आणि नंदीला प्रसिद्ध देवगड हापूस आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -