तुमच्या हक्कांप्रती जागरूक व्हा!
तुम्ही नेहमीच ग्राहक जागरण मंचाची 'जागो ग्राहक जागो' ही जाहिरात पाहता. या जाहिरातीद्वारे सरकार जनतेला आपल्या अधिकारांप्रती जागृक करण्याचे काम करते. पण तरीही अनेकवेळा ग्राहकाची फसवणूक होऊनही आपल्या हक्काविषयी जागृक नसल्याने कुठे जावे याचे ज्ञान त्याला नसते. कारण यासाठी ग्राहक न्यायालयात दाद मागण्याची प्रक्रियाच माहित नसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्राहक न्यायालयात फसवणूक झालेली व्यक्ती, कुटुंबीय, नागरिकांचा समूह, मृत व्यक्तीचा वारस, राज्य अथवा केंद्र सरकार असे कोणीही याचिका दाखल करून दाद मागू शकता.
ग्राहक न्यायालयात य़ाचिका दाखल करण्याची फी वेगवेगळी आहे. 1 लाख रुपयापर्यंतच्या याचिकेसाठी 100 रुपये, एक ते पाच लाख रुपयापर्यंतच्या याचिकेसाठी 200 रुपये, दहा लाख रुपयापर्यतसाठी 400 रुपये, 20 लाखापर्यंत 500 रुपये, 50 लाखापर्यंत 2000रुपये आणि एक कोटी रुपयापर्यंतच्या याचिकेसाठी 4000 रुपये भरावे लागतात
तुमची जर फसवणूक झाली असल्यास तुम्ही दुकानदार, उत्पादक आणि सेवा पुरवणाऱ्या कंपनीविरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागू शकता.
याचिका दाखल झाल्यानंतर ग्राहक न्यायालय त्याची योग्य दखल घेऊन कारवाई करतो.
दाद मागण्यासाठी तुम्हाला तक्रारीच्या तीन प्रति आवश्यक आहेत. ज्यातील एक प्रत विरोधी पक्षाला, दुसरी प्रत तुमच्याकडे आणि तिसरी प्रत ग्राहक न्यायालयात द्यावी लागते.
ग्राहक न्यायालयात ही तक्रार पाठवताना तुम्हाला पोस्टर मनी ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे फी भरावी लागते. डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल मनी ऑर्डर प्रेजिडंट, डिस्ट्रिक्ट फोरम किंवा स्टेट फोरमच्या नावे काढावा लागतो.
ग्राहक न्यायालयात दाद मागण्यापूर्वी संबंधित ग्राहकाकडे प्रबळ पुरावा, कॅश मेमो, पावती, कराराची कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -