शिवराज्याभिषेक सोहळ्याचे 4 फोटो
रायगडावर काल 345 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल सकाळी 6 वा. नगारखाना येथे ध्वजपूजन, 6.50 वा. राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम, 9.30 वा. छ. शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन, 9.50 वा. छ. संभाजीराजे आणि युवराज शहाजीराजे यांचे राजसदरेवर स्वागत, 10.10 वा. छ. संभाजीराजे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांवर अभिषेक तसेच मेघडंबरीतील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक, 10.25 वा. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंग सावंत यांचे प्रास्ताविक, 10.30 वा. छ. संभाजीराजे यांचे शिवरायांना अभिवादन, 11 वा. शिवपालखी सोहळा. या पालखी सोहळ्याची सांगता जगदीश्व र मंदिर आणि छ. शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी करण्यात आली.
होळीच्या माळावर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, शाहिरी जलसा, छ. संभाजीराजे यांनी शिवभक्तांचशी थेट संवाद साधला. रात्री 8.30 वा. गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ घालण्यात आला. जगदीश्वकर मंदिरात वारकरी सांप्रदायांकडून जगदीश्वंराचे कीर्तन, जागर, काकडआरती, शाहिरी कार्यक्रम झाला.
या सोहळ्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती खास तयारी करतात. यावेळी त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे उपस्थित राहतात. संभाजीराजे एक दिवस आधीच चित्तदरवाजामार्गे शिवभक्तांदसमवेत पायी गडावर गेले. नगारखाना इथं 21 गावांतील सरपंच आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत गडपूजन झाले. गडावर उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संभाजीराजे यांच्या हस्ते झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -