तरुणीने साकारले अद्भुत शिवराय
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंकिता नवघरे असं या तरुणीचं नाव असून तीने कुठल्याही कलेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. सुमारे 40 किलो वजनाचे हे चित्र आहे. चित्र तयार करण्यासाठी कमी-अधिक लांबीच्या स्क्रूंचा वापर करावा लागला.
याआधी अंकिताने वारली पेंटिंग, पॉइंटिलिझम, ऍबस्ट्रॅक्ट आर्ट, सिरॅमिक , म्युरल आदी कलाप्रकारातही आपले कौशल्य दाखविले आहे.
तब्बल 17 हजार स्क्रूंचा वापर करून तयार केलेली कलाकृती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबईत येत्या 12 ऑक्टोबरपासून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मुंबई-आर्ट-फेयर प्रदर्शनात तिच्या या चित्राचा समावेश होणार आहे.
चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरातील अभियंता युवतीने एका अनोख्या पद्धतीने थक्क करणारी कलाकृती साकारली आहे. तब्बल 17 हजार स्क्रूंचा वापर करुन युवतीने शिवाजी महाराजांचे चित्र तयार केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -