न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष
जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्यांच्या विचारांची ओळख जगाला व्हावी, यासाठी हे फाऊंडेशन वर्षभर अनेक उपक्रम राबवत असतं. यातून यंदा जगातील अनेक देशांमध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. जर्मनी, इंग्लंड, रशिया, चीन, जपान, दक्षिण आफ्रिकेसह अनेक युरोपीय-आशियाई देशांचा याच समावेश आहे.
यासोबतच खासदार संभाजीराजे, खासदार सुप्रिया सुळे, अभिनेता रितेश देशमुख यांनी व्हिडीओद्वारे उपस्थितांना संबोधित करत शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय दूतावास फेटेधारी शिवभक्त नागरिक आणि मुला-मुलांनी फुलून गेलं होतं. यामध्ये मराठीजनांसह देशातील इतर राज्यातील भारतीय आणि अमेरिकन नागरिकांचा समावेश होता.
यावर्षी छत्रपती फाऊंडेशनसोबत अल्बनी ढोल पथकानंही या आयोजनात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला मराठमोळा चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळेंची खास उपस्थिती होती. या कार्यक्रमाला भारताचे अमेरिकेतील उपराजदूत शत्रुघ्न सिन्हा, सिनेटर केविन टॉमस यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यूयार्कमध्ये गेल्या पाच वर्षांपासून शिवजयंतीला शिवघोष दुमदुमत आहे. भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांनी स्थापन केलेल्या 'छत्रपती फाऊंडेशन' दरवर्षी या सोहळ्याचं आयोजन करतं. आज न्यूयार्कमधील भारतीय दूतावासात शिवजयंती सोहळा मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला.
अमेरिकेच्या न्यूयार्कमधील भारतीय दूतावास आज 'जय भवानी, जय शिवाजी' या घोषणांनी अक्षरशः दुमदुमून गेलं. निमित्त होतं न्यूयॉर्कमधील दूतावासात साजऱ्या केलेल्या शिवजयंती उत्सवाचं. या कार्यक्रमाला मराठमोळा चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळेंची खास उपस्थिती होती.