Bigg Boss 11: पत्रकार परिषदेतच शिल्पा शिंदेला रडू कोसळलं!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिना आणि विकासचं बोलणं ऐकून शिल्पा म्हणाली की, 'शोच्या सुरुवातीपासूनच मला एकटीला खेळावं लागलं. कुणीही माझी कधीच साथ दिली नाही. मी कायम या सर्वांच्या निशाण्यावर होते.'
'मी कॅमेऱ्यासाठी कोणताही फालतू टास्क करत नाही. मी कणखर आहे हेच मला कुणाला दाखवून द्यायला नको होतं.' असंही ती यावेळी म्हणाली.
आपल्यावरील आरोपांमुळे शिल्पा शिंदेला भर पत्रकार परिषदेतच रडू कोसळलं. एवढंच नाहीतर पत्रकार परिषदेनंतरही ती ढसाढसा रडत होती.
जशी प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली तसं हिना खान, विकास गुप्ता आणि आकाश ददलानी यांनी शिल्पा शिंदेवर निशाणा साधला. शिल्पा कोणत्याच टास्कमध्ये भाग घेत नाही असा त्यांनी आरोप केला. ती फक्त जेवण बनवून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते. असंही ते यावेळी म्हणाले.
रियालिटी शो 'बिग बॉस'च्या 11व्या पर्वातील फिनाले वीकमध्ये स्पर्धकांचा पहिल्यांदाच पत्रकारांशी सामना झाला. पण पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी प्रत्येक स्पर्धक एकमेकांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -