पहिल्या दिवशी उपहारापूर्वीच शतक ठोकणारा धवन पहिला भारतीय!

धवनने आधी 47 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मग त्याने धावगती वाढवत अवघ्या 87 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याच्या शतकाला 18 चौकार आणि तीन खणखणीत षटकारांचा साज होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्णधाराचा हा निर्णय सलामीवीर धवन आणि मुरली विजयने सार्थ ठरवला.

पहिल्या दिवशीच उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन हा जगातील सहावा, तर पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. धवनने अवघ्या 87 चेंडूत शतक झळकावलं.
उपहारापूर्वी खेळ थांबला त्यावेळी भारताने 27 षटकात बिनबाद 158 धावा केल्या होत्या. मुरली विजय 72 चेंडूत नाबाद 41 तर शिखर धवन 91 चेंडूत 104 धावांवर खेळत होता.
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत भारताचा सलामीवीर शिखर धवनने खणखणीत शतक झळकावलं.
या कसोटीत कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -