राजस्थान रॉयल्सला धक्का, हा दिग्गज मायदेशात परतणार!
वॉर्नने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपण जात असल्याची माहिती दिली. आजचा दिवस हा आपला राजस्थान रॉयल्ससोबतचा अखेरचा दिवस आहे. आयपीएलमध्ये सहभाग घेऊन आनंद झाला, असं त्यांनी म्हटलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालिकेत आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी धडपडत असलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी शेन वॉर्न नसणं हा एक मोठा धक्का आहे.
राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक शेन वॉर्न मायदेशात परतणार आहेत.
मुंबईच्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना गवसलेला सूर लक्षात घेता, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईचं पारड जड ठरणार आहे. मात्र राजस्थान रॉयल्सचा हा सर्व संघर्ष चालू असतानाच दिग्गज खेळाडूने संघाची साथ सोडली आहे.
आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई आणि राजस्थानने पाच विजयांसह दहा गुणांचीच कमाई केली आहे. पण मुंबईने कोलकात्यावर 102 धावांनी मिळवलेल्या विजयाने रोहितसेनेचा नेट रनरेट अतिशय उत्तम आहे.
यंदाच्या मोसमात प्ले ऑफचं तिकीट मिळवायचं तर मुंबई आणि राजस्थान या दोन्ही संघांना पराभव परवडणारा नाही. त्यामुळं वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेच्या संघांसाठी 'करो या मरो'ची स्थिती आहे.
आयपीएलच्या रणांगणात आजचं मुख्य आकर्षण असलेला मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांमधला सामना रात्री आठ वाजता खेळवण्यात येईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -