कार्तिकसारखा फलंदाज आतापर्यंत पाहिला नाही : शाकिब अल हसन

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसननेही दिनेश कार्तिकच्या या तुफान खेळीचं कौतुक केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
''क्रिकेटमधील हा एक सर्वोत्कृष्ट सामना होता. एक दिवस आम्हीही जिंकू,'' अशी अपेक्षा शाकिबने व्यक्त केली.

''मुस्ताफिजुर रहमानने 18 व्या षटकात चांगली गोलंदाजी केल्यानंतर भारताला विजयासाठी 12 चेंडूत 34 धावांची गरज होती. त्यावेळी रुबेल आमचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज होता. त्याने ज्या पद्धतीने अगोदरची तीन षटकं गोलंदाजी केली होती, ते पाहून असा विचार केला, की त्याने खराब गोलंदाजी केली तरी फार फार तर 15 धावा जातील. ज्यामुळे अखेरच्या षटकात आमच्याकडे बचावासाठी 19 धावा उरतील,'' असं शाकिबने सांगितलं.
दिनेश कार्तिक येताच रुबेलला गोलंदाजी का दिली, याचंही उत्तर शाकिबने दिलं.
श्रीलंकेच्या चाहत्यांवरही शाकिबने मत व्यक्त केलं. ''परदेशात आम्ही नेहमी द्विपक्षीय मालिका खेळतो आणि कधीही तिथे चाहत्यांच्या पाठिंब्याची अपेक्षा करत नाही. आमचं लक्ष त्याकडे कधीही नसतं आणि त्याचा विचारही करत नाही, की चाहते कुणाला पाठिंबा देत आहेत,'' असं स्पष्टीकरण शाकिबने दिलं.
''लो फुलटॉसवर फटकार मारणं कठीण काम असतं आणि दिनेश कार्तिकने ते करुन दाखवलं. त्याने 8 पैकी 5 चेंडू सीमा रेषेबाहेर पाठवले. असा फलंदाज नाही पाहिला जो पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकतो आणि शेवटपर्यंत चेंडू सीमा रेषेबाहेरच पाठवतो,'' असं शाकिब म्हणाला.
दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -