जबरा फॅन्सनी किंगखानला दमवलं!
एबीपी माझा वेब टीम | 10 Jan 2017 05:28 PM (IST)
1
मुंबईतील वांद्रे परिसरात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या हस्ते ‘#Bandra’ या शिल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र, यावेळी शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.
2
गर्दीतून वाट काढत शाहरूख कसाबसा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचला. अखेर 10 मिनिटात त्यानं उद्घाटन उरकलं.
3
या चेंगराचेंगरीत अनेक पत्रकार आणि उपस्थित नागरिक खाली पडले.
4
या कार्यक्रमाला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या.
5
शाहरुखचे चाहते आणि भाजप कार्यकर्ते यांनी केलेल्या गर्दीमुळे काही वेळासाठी वाहतूकही खोळंबली होती.
6
7
चाहत्यांच्या गराड्यातून बाहेर पडताना शाहरुखची चांगलीच दमछाक झाली.