योगेश्वर दत्तवर वीरुचं जबरदस्त ट्वीट!

याच ट्वीटमध्ये त्यानं असं लिहलं आहे की, योगेश्वर दत्तचं पदकही बदलणार आहे. कांस्य पदक अपग्रेड होऊन ते रौप्य होणार आहे. योगेश्वर ट्वीट करताना सेहवागनं क्रिकेट आणि नेहरावरही टिप्पणी केली. पण सेहवागचा हाच अंदाज चाहत्यांना मात्र भलताच आवडतो आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
त्याचबरोबर त्यानं नेहरालाही मिष्किलपणे टोमणा मारला. अनेक वर्षापासून नोकियाचा साधा मोबाइल वापरणारा नेहरा देखील अपग्रेड झाला असून त्यानंही स्मार्टफोन घेतला आहे.

खेळाशी निगडीत गोष्ट आल्यावर सेहवाग गप्प तरी कसा बसणार? त्यावर त्यानं तात्काळ एक ट्वीट केलं. ट्वीटमध्ये सेहवागनं नुकत्याच अमेरिकेत झालेल्या टी-20 भारत-विंडीज सामन्यांचा उल्लेख केला. क्रिकेट अपग्रेड होऊन अमेरिकेपर्यंत पोहचलं.
2012 साली लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या योगेश्वर दत्तला आता रौप्य पदक मिळणार आहे. रौप्य पदक विजेता रशियन खेळाडू बेसिक खुदोखोज हा डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याचं रौप्यपदक आता भारताच्या योगेश्वर दत्तला मिळणार आहे.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग ट्विटरवर सध्या जोरदार फटकेबाजी करतो आहे. वीरेंद्र सध्या जवळजवळ प्रत्येक गोष्टींवर त्याच्या अंदाजात ट्वीट करतो. योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाऐवजी रौप्य पदक मिळणार असल्याचं आज जाहीर झालं त्यानंतर वीरुनं यावरही मिष्किल अंदाजात ट्वीट केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -