सरकारला तुमची आयडिया सांगा आणि 10 लाख मिळवा!
स्टीलमध्ये भारताला दुसऱ्या देशावर अवलंबून रहावं लागू नये, यासाठी तुम्हाला तुमची आयडिया सांगायची आहे. जेणे करुन परदेशातून होणारी स्टील आयात कमी होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया उपक्रमात भाग घेणाऱ्याला MyGov या वेबसाईटवर 500 शब्दांमध्ये स्वतःचं मत मांडायचं आहे. तुमची आयडिया स्टील मंत्रालयाला कशा प्रकारे मदत करु शकते, हे ‘माय लव्ह स्टील आयडिया’ या उपक्रमातून तुम्हाला सांगायचं आहे.
यामध्ये सरकारने तीन प्रकारांमध्ये बक्षीस ठेवलं आहे. सर्वोत्कृष्ट आयडिया देणाऱ्याला 10 लाख रुपये मिळतील. तर दुसऱ्या क्रमांकासाठी 5 लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या आयडियासाठी 2 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी नेहमीच लोकसहभागाचं आवाहन करत असतात. कल्याणकारी योजनांमध्ये जनतेचं मत जाणून घेण्यावर मोदी सरकारचा नेहमीच जोर असतो.
याचाच एक भाग म्हणून सरकारने लोकांच्या आयडिया मागवल्या आहेत, ज्याद्वारे योजना आणखी यशस्वी करता येतील. तुम्हीही तुमची आयडिया देऊन दहा लाख रुपयांपर्यंत बक्षीस मिळवू शकता.
या उपक्रमात सहभाग घ्यायचा असेल तर 15 डिसेंबरपर्यंत तुमची आयडिया सरकारला पाठवू शकता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -