पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदवर आणखी एक जबाबदारी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून पाकिस्तानमध्ये परतलेल्या पाकिस्तान संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला.
सरफराजला नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात मिस्बाह-उल-हकचा सहाय्यक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. तो आता कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल, असंही पीसीबीच्या अधिकाऱ्याने म्हटलं.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदवर आता कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीचे चेअरमन शहरयान खान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काळात लंडनमध्येच होते. त्यांनी सरफराजला कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतावर मात करत चषकावर नाव कोरलं.
शहरयार खान पाकिस्तानमध्ये परतताच औपचारिक घोषणा केली जाईल. मात्र निर्णय घेण्यात आला असून हा अंतिम निर्णय आहे, असं पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितलं.