कैची- वस्तऱ्याने डोक्यावर आर्ची साकारली !
संतोष काशीदचा पिडीजात केशकर्तनाचा व्यवसाय आहे. वडिलांनी शिक्षणाबरोबर त्याला कैचिचं कौशल्य शिकवलं. संतोषने पारंपारिक कलेला छेद देत, त्यामध्ये नाविन्य शोधलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंतोषची ही कला इतकी दूरवर पोहोचली आहे, की दररोज जवळपास शंभर फोन, त्याला केस कटिंगसाठी नंबर लावणारे येतात.
संतोषन यापूर्वी अनेक चित्रं शौकिनांच्या डोक्यावर रेखाटली आहेत.
मला डोक्यावर आर्ची साकारायची आहे, ही फर्माईश त्याने संतोषला काशीदला सांगितली.
मग संतोषची कैची हळूहळू ओंकारच्या डोक्यावरुन फिरु लागली. हळूहळू डोक्यावर आर्चीचं चित्र साकारु लागलं. तब्बल अडीच तासाच्या अथक कौशल्यानंतर आर्चीचं रुप ओंकारच्या डोक्यावर साकारलं.
ओंकारला जेव्हा याबाबतची माहिती समजली, तेव्हा तो संतोषचा पत्ता शोधत ओगलेवाडीत पोहोचला. डोक्यात संचारलेलं आर्चीचं भूत डोक्यावर उतरवण्यासाठी तो साताऱ्यातून संतोषच्या दुकानात आला.
ओंकार हा साताऱ्याचा रहिवाशी आहे. त्याने तब्बल 37 वेळा सैराट सिनेमा पाहिला आहे. कराडमधील ओगलेवाडीत संतोष काशीदचं सलून आहे. संतोषच्या हातात जादूई कला असल्याची ख्याती परिसरात पसरली आहे. संतोष कोणाचाही चेहरा हुबेहुब डोक्यावर रेखाटतो.
ओंकार कांबळे असं या फॅनचं नाव असून, त्याने चक्क केसांमध्ये आर्चीचं चित्र रेखाटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ही जादूई कला, कराडच्या संतोष काशीदने रेखाटली आहे.
नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने महाराष्ट्राला याड लावलं. आर्ची-परशाच्या प्रेमकहाणीला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आर्ची अर्थात रिंकू राजगुरुची एक झलक पाहण्यासाठी गावोगावच्या तरुणांची अक्षरश: झुंबड उडाली. रिंकूचा असाच एक फॅन आहे ज्याने आर्चीचं डोक्यातलं प्रेम डोक्यावर उतरवलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -