आलोकनाथ यांच्या मुलाचा मध्यरात्री राडा
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2016 10:13 AM (IST)
1
पण, पोलिसांनी त्याला सांताक्रुझ भागात अडवलं. तिथंही मद्यधुंद शिवांग आणि त्याच्या मित्रानं पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.
2
अलोक नाथ यांचा मुलगा शिवांग रात्री आपल्या मैत्रिणीच्या बर्थ डे पार्टीतून परतत होता. याचवेळी खार पोलिसांनी त्यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, गाडी थांबवण्याऐवजी शिवांगनं ती आणखी वेगात पळवायला सुरुवात केली.
3
त्याच्यावर मुंबई पोलिसांनी ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई केली आहे.
4
संस्कारी बाबूजी फेम प्रसिद्ध अभिनेते अलोक नाथ यांच्या मुलाने काल मध्यरात्री असंस्कारी कारनामा केला आहे.
5
दरम्यान, पोलिसांनी शिवांगची गाडी जप्त केली असून त्याला 2600 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
6
आज त्याच्यासह सर्व मित्रांना वांद्रे न्यायालयात हजर केलं जाणार आहे.