चाहत्यांचे 'पर्सनल' प्रश्न, सानिया मिर्झाची उत्तरं

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आवडतं पर्यटनस्थळ मालदीव

आवडता गायक कोण यावर सानियाने अरिजीत सिंग असं उत्तर दिलं.
याशिवाय रिकाम्या वेळेत तू काय करतेस, असा प्रश्नही सानियाला विचारण्यात आला. त्यावर सानियाने मजेशीर उत्तर देत, ‘काहीच नाही’ असं ट्विट केलं.
दुसऱ्या एका फॅनने सानियाला विराट कोहलीचं एका शब्दात वर्णन करण्याचा आग्रह केला. त्यावर सानियाने ‘चॅम्पियन’ असं ट्विट केलं.
एका फॅनने सानियाला श्रीलंकेचा आवडता खेळाडू कोण असा प्रश्न ट्विटरवर विचारला. त्यावर सानियाने कुमार संगकाराचं नाव घेतलं.
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाचं क्रिकेटप्रेम जगजाहीर आहे. स्वत: टेनिस खेळणाऱ्या सानियाचं दुसरं प्रेम क्रिकेट आहे. त्यामुळेच की काय पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी तिने लगीनगाठ बांधली.
भारताचा आवडता खेळाडू कोण, असं सानियाला विचारण्यात आलं. त्यावर सानियाने विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे आवडते भारतीय क्रिकेटपटू असल्याचं सांगितलं.
सानियाने यावेळी तिच्या आवडत्या भारतीय क्रिकेटपटूंची नावं सांगितलीच, शिवाय श्रीलंकेचा आवडता खेळाडू कोण हे सुद्धा सांगितलं.
खरंतर तिच्या चाहत्यांनी सानियाला खूपच रंजक प्रश्न विचारले, पण तरीही सानियाने त्या प्रश्नांची उत्तरं दिली.
शाहरुखचं थोडक्यात वर्णन करताना एक विनोदी आणि चांगला माणूस असं सानिया म्हणाली. तर कुछ कुछ होता है हा आवडता सिनेमा असल्याचं तिने सांगितलं.
सानियाला ट्विटरवरुन अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावरुन तिचं क्रिकेटप्रेम आणखी अधोरेखित होतं.
मात्र सानियाला चाहत्यांनी भारताचा आवडता क्रिकेटपटू कोण, यासह अनेक ‘पर्सनल’ प्रश्न विचारण्यात आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -