✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

गोधडीवर साकारला शिवराज्याभिषेक सोहळा

एबीपी माझा वेब टीम   |  17 Jan 2019 11:57 AM (IST)
1

दांडेकर यांच्या कला शिक्षिकीच्या हस्ते यावेळी या भव्य दिव्य शिवराज्याभिषकाच्या सुंदर कलाकृतीचे अनावरण संपन्न झाले . ही कलाकृती पाहण्यासाठी सांगलीकरानी मोठी गर्दी केली होती.

2

ही गोधडी साकारण्यासाठी श्रुती दांडेकर यांना तब्बल दहा महिने आणि 807 तासाचा कालावधी लागला आहे. तर गोधडीवर शिवराज्याभिषिक साकारण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन घेऊन सुरुवात केली. पुण्याच्या मनीषा अय्यर यांच्या स्टुडियो बानीमध्ये याचं संपूर्ण शिवणकाम केलं आहे.

3

क्विल्टमध्ये अगदी 3 मिमी इतक्या लहान कपड्यांच्या तुकड्याचा समावेश आहे. राज्याभिषेकाच्या पेंटिंगप्रमाणे हुबेहूब कलाकृती या गोधडीमध्ये रेखीव स्वरुपात साकारली आहे. प्रत्येक गोष्ट याठिकाणी अत्यंत बारकाईने जोडण्यात आली आहे.

4

तत्पूर्वी सांगलीच्या आभाळमाया फाऊंडेशनेने श्रुती दांडेकर यांची ही कलाकृती आणि छत्रपतींच्या इतिहासाला सांगलीकरांच्या प्रथम समोर आणण्याच्या उद्देशाने आज मोठ्या दिमाखात शानदार सोहळ्यात अनावरण केले आहे.

5

आता ही क्विल्ट म्हणजेच गोधडी 25 ते 27 जानेवारी चेन्नई इथे होणाऱ्या इंडिया क्विल्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहे. शिवाय फेस्टिवलमध्येही छत्रपतींच्या राज्याभिषेकाची गोधडी अर्थात क्विल्ट प्रमुख आकर्षया असणार आहे.

6

डिझायनर असणाऱ्या सांगलीच्या श्रुती दांडेकर गेल्या काही वर्षांपासून पारंपारिक गोधडीला नव्या रुपात जगासमोर आणण्याचा काम करत आहेत. आजीबाईची समजली जाणारी गोधडी दांडेकर यांनी क्विल्टच्या रुपाने सातासमुद्रापार नेली आहे. आज त्यांच्या या गोधडीला म्हणजेच क्विल्टला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या रुपाने नवा आयाम मिळाला आहे. छत्रपतीचा इतिहास जगभर पोहोचावा या उद्देशाने श्रुती दांडेकर यांनी या कलाकृतीची निर्मिती केली आहे.

7

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची सुंदर कलाकृती एका 'क्विल्ट' वर म्हणजेच 'गोधडी'वर साकारण्यात आली आहे. तब्बल 20 हजार 888 कापडी तुकडे, 288 रंगछटा आणि 19 बाय 8 फुटांचा थक्क करणारा राज्याभिषेक सोहळा सांगलीच्या महिला आर्किटेक्ट श्रुती दांडेकर साकारला आहे. सांगलीत मोठ्य दिमाखात या शिवराज्यभिषेक गोधडीचे अनावरण करण्यात आलं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • गोधडीवर साकारला शिवराज्याभिषेक सोहळा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.