सुदर्शन पटनाईक यांच्या कलेचे कोकण किनारपट्टीवर अनोखे दर्शन
या दौऱ्यात रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांच्या कलेचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी लतादीदींचे शिल्प साकारुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणातील मालवण, रत्नागिरीनंतर आता गणपतीपुळेच्या समुद्र किनारी पटनाईक आपले महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पुढील वाळूशिल्प साकारणार आहेत.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ओरीसातील वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
महाराष्ट्राच्या 23 समुद्र किनाऱ्यांवर सध्या निर्मल सागर तट अभियान राबवलं जातं आहे. या अभियानात पटनाईक वाळूशिल्पाच्या माध्यमातून किनारा स्वच्छतेचं महत्व पटवून देत आहेत.
याशिवाय त्यांनी आणखीन एक शिल्प साकारुन समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. त्यांची शिल्पे बघण्यासाठी सध्या रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर लोक गर्दी करताहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -