सॅमसंग गॅलक्सी On7 प्रो आणि On5 प्रोचे नवे व्हेरिएंट लाँच
सॅमसंगनं मागील वर्षी लाँच केलेले स्मार्टफोन गॅलक्सी On7 प्रो आणि On5 प्रोला अॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आलं आहे. हे दोन्ही स्मार्टफोन मागील वर्षी लाँच करण्यात आले होते. आता लिस्ट केलेले हो दोन्ही अपग्रेडेड व्हेरिएंट आहेत. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत 9,190 रु. आणि 11,190 रु. आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOn7 प्रो स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची किंमत 11,190 रु. आहे.
On7 प्रो स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच डिस्प्ले असून याचं रेझ्युलेशन 1080 पिक्सल आहे. यामध्ये 2 जीबी रॅम असून 16 जीबी इंटरनल मेमेरी देण्यात आली आहे.
On5 प्रो स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसंच यामध्ये 2,600 mAh बॅटरी क्षमता आहे. याची किंमत 9,190 रु. आहे.
On5 प्रो स्मार्टफोनमध्ये 5 इंच डिस्प्ले असून त्याचं रेझ्युलेशन 1280x720 आहे. प्रोसेसरचा विचार केल्यास 1.3Ghz क्वॉडकोअर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम आहे. या फोनमध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी आहे.
या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचे काही खास फीचर असणार आहे. ज्यामध्ये अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोड, s बाइक मोड असणार आहे.
या दोन्ही स्मार्टफोनमध्ये पूर्वीपेक्षा अधिक चांगलं रॅम आणि दुप्पट इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. तर हे दोन्ही स्मार्टफोन 6.0 मार्शमेलो ओएस सपोर्ट असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -