सॅमसंग Galaxy Note7 होणार 2 ऑगस्टला लाँच!
यासह यात इतरही काही खास फीचर्स असणार असल्याचं समजतं आहे.
यामध्ये 4,200mAh बॅटरी असणार असल्याचीही चर्चा आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल कॅमेरा असण्याचीही चर्चा आहे.
या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 823, हाय क्लॉक स्पीड आणि 6GB रॅम असू शकते. तसेच 256 जीबी स्टोरेज क्षमतेसाठी सॅमसंग गॅलेक्सी बरंच चर्चेत आहे.
यामध्ये कर्व्ह डिस्प्लेसह 5.8 इंच फ्लॅट स्क्रिन असणार आहे. तसेच यात QHD पिक्सल रेझ्युलेशन असणाऱआ आहे. त्यामुळे याचा डिस्प्ले एचडीपेक्षाही चार पटीनं मोठा असणार आहे.
याआधी लीक झालेल्या माहितीनुसार, या नव्या फॅबलेटचं डायमेंशन 153x745 आणि 7.8mm असणार आहे. नोट 5च्या तुलनेनं हा स्मार्टफोन आणखी स्लीम असेल.
याशिवाय या ग्राफिक्स फोटोमध्ये '7' नंबर दाखविण्यात आला आहे. तसेच यामध्ये एक टॅग लाईनही दाखविण्यात आली आहे. द नेक्स्ट एज इज जस्ट अराउंड द कॉर्नर
या फोटोमध्ये माहिती देण्यात आली आहे. गॅलक्सी नोट 7 आणि नोट 7 एज स्मार्टफोन 2 ऑगस्ट 2016ला लाँच करण्यात येणार आहेत.
gsmarena वर सॅमसंग गॅलक्सी नोट 7 चा हा कथित फोटो अनपॅक्ड 2016 इव्हेंट करण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलरी नोट 7बाबत वारंवार अनेक रिपोर्ट समोर येत आहेत. आता गॅलक्सी नोट 7चा एक टीजर समोर आला आहे. यामध्ये सॅमसंगनं या फ्लॅगशिपच्या लाँचिंगची माहिती दिली आहे.