सलमान खान बिग बॉसच्या दहाव्या सिझनमधील कमाईचा मोठा हिस्सा करणार डोनेट
पण दहाव्या सिझनमधील त्याचे मानधन गरजूंना मदतीसाठी देण्यात येणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातवारण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिग बॉसच्या नवव्या सिझनला होस्ट करण्यासाठी सलमानला सात ते आठ कोटी रूपये मानधन मिळाले होते.
विशेष म्हणजे, सलमान खान बिग बॉसचा दहावा सिझन होस्ट करण्यासाठी कमी मानधन घेणार आहे.
रिअॅलिटी शो 'बिग बॉस' आपल्या प्रत्येक सिझनमध्ये चर्चेत असतो. सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करत असल्याने या शोची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते इच्छूक असतात. सध्या बिग बॉसच्या सूत्रसंचालनातून मिळणाऱ्या मानधनाबद्द्ल आलेल्या बातमीने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
देशात रिअॅलिटी शो होस्ट करण्यासाठी चांगले मानधन मिळवणाऱ्यांच्या यादीत सलमान खानचा अव्वल क्रमांक आहे. सलमान खान होस्ट करीत असलेल्या बिग बॉसच्या दहाव्या सिझनमध्ये मिळणाऱ्या मानधनातील मोठा भाग, त्याची स्वयंसेवी संस्था 'बिइंग ह्यूमन'ला डोनेट करणार आहे.
सलमान खानला सुपरस्टारसोबत त्याच्या चॅरेटीवरूनही ओळखले जाते. गरजूंना चॉरिटीसाठी सलमान खान सदैव तत्पर असतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -