सलमान आणि ऑनस्क्रीन मुलाची 9 वर्षांनी भेट!
'पार्टनर'मधील अलीने साकारलेलं रोहन हे पात्र अतिशय खट्याळ होतं. सिनेमात रोहनला प्रेम अर्थात सलमान आवडत नसतो. त्यामुळे रोहनच्या गूड बुक्समध्ये राहण्यासाठी प्रेम प्रयत्न करत असतो.
2006 मध्ये आलेल्या पार्टनर सिनेमातील चिमुकला रोहन आठवतोय? रोहन अर्थात अली हाजी तब्बल 9 वर्षांनंतर त्याच्या रीललाईफ वडिलांना भेटला. 'बिग बॉस 10'च्या सेटवर सलमान खान आणि अली हाजीची भेट झाली.
2006 मध्ये आलेल्या पार्टनर सिनेमातील चिमुकला रोहन आठवतोय? रोहन अर्थात अली हाजी तब्बल 9 वर्षांनंतर त्याच्या रीललाईफ वडिलांना भेटला. 'बिग बॉस 10'च्या सेटवर सलमान खान आणि अली हाजीची भेट झाली.
अली हाजीने ता रा रम पममध्ये सैफ अली खान आणि राणी मुखर्जीच्य मुलीची भूमिका साकारली होती. तेव्हा तो केवळ 8 वर्षांचा होता.
17 वर्षीय अली हाजी लवकरच राधिका आपटे आणि हॉलिवूड अभिनेता ब्रेण्डन फेजरसोबत स्क्रीन शेअर करण्याची शक्यता आहे.
अलीने अमिताभ बच्चन यांच्या 'फॅमिली', आमीर-काजोलच्या 'फना', सैफ अली खान-राणी मुखर्जीच्या 'ता रा रम पम', शाहिद-आएशाच्या 'पाठशाला'मध्ये भूमिका साकारल्या आहेत.
अली हाजी आता अतिशय सुंदर दिसू लागला आहे. ब्लॅक सूटमध्ये तो एकदम डॅशिंग दिसत आहे.
आमीर आणि कालोजलच्या 'फना'मधील त्याची 'रेहान'ही भूमिकाही लोकांना आवडली होती.