कथित गर्लफ्रेंड यूलियासह सलमानची अर्पिताच्या वाढदिवसाला हजेरी
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये युलिया सलमानच्या कुटुंबियांसोबत दिसल्याने पुन्हा एकदा या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड स्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचा काल वाढदिवस होता. बांद्र्यातील घरी हे सेलिब्रेशन पार पडलं. यावेळी सलमानची कथित गर्लफ्रेंड यूलियासह पूर्ण परिवार उपस्थित होता.
सलमान आणि युलिया यांच्या अफेअरची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
पार्टीनंतर सलमानने वडिल सलीन खान यांना गाडी पर्यंत सोडलं.
सोहेल खान आपल्या पत्नीसह उपस्थित होता.
सलमानच्या कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला उपस्थित होते.
सलमान यूलियासोबत कॅमेऱ्यात कैद होऊ नये, याची नेहमी काळजी घेत असतो. मात्र कालच्या पार्टीमध्ये सलमान आणि युलिया कॅमेऱ्यांच्या नजरेतून वाचू शकले नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -