माफी मागावी यासाठी दबाव टाकणं बरोबर नाही: सलीम खान
यापुढे सलीम खान म्हणाले की, 'माफी मागण्यासाठी कुणावर दबाब टाकणं याला काहीही अर्थ नाही.'
सलीम खान म्हणाले की, अनेकदा लोकं समस्येपासून सुटका मिळावी यासाठी लोकं माफी मागतात. यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळतो. पण मीडियाच्या व्यावसायिक अडचणीमुळे त्यांना हे मुद्दे अनेक वेळ चालवावे लागतात.
सलमानच्या वतीने माफी मागणाऱ्या त्याच्या वडिलांनी मात्र या प्रकरणी मीडियावर टीका केली आहे. कारण की, गरजेपेक्षा जास्त मीडियानं हे प्रकरणाची चर्चा केली असं त्यांचं म्हणणं आहे.
या वक्तव्यानंतर सलमाननं अद्यापही माफी मागितलेली नाही.
सुलतान सिनेमाच्या शुटींगनंतर मला एखाद्या बलात्कार झालेल्या तरुणीसारखं वाटतं. असं वादग्रस्त वक्तव्य सलमाननं केलं होतं.
प्रसिद्ध चित्रपट कथा लेखक सलीम खान यांनी आपला मुलगा सलमान खान याची पाठराखण केली आहे. बलात्कार पीडित वक्तव्याविषयी सलमानवर बरीच टीका करण्यात येत आहे. याबाबतच बोलताना सलीम खान म्हणाले की, मीडियाने त्या मुद्द्याची गरजेपेक्षा जास्त चर्चा केली.