'माझा सन्मान'मुळे आवडत्या अभिनेत्याला भेटले : रिंकू राजगुरु
सन्मानमूर्तींमध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांसह 'सैराट'फेम आर्ची-परशा अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा माझा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.
असामान्य कर्तृत्वाने महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या रत्नांचा 2 जुलै रोजी ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
करिअरच्या सुरुवातीलाच पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यानंतर 'एबीपी माझा'चा हा मानाचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला, त्यामुळे आपला आनंद हा शब्दात सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया ‘सैराट’फेम रिंकू राजगुरुने व्यक्त केली.
देशाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमीर खान यांच्या हस्ते 11 रत्नांचा सन्मान करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्यात अनेकांच्या नजरा आर्ची अर्थात रिंकू राजगुरु आणि नागराज मंजुळे यांच्याकडेच होत्या. मात्र आकाश काही कारणांमुळे सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही.