चिकन, 2 चपात्या आणि डाळ.. बॅडमिंटन स्टार सायनाचा आहार
कठिण सराव आणि संतुलित आहाराच्या आधारावरच सायना विजयाला गवसणी घालते.
सायना घरी असेल तर चारमिनारची जिलेबी आणि काजू बर्फीला प्राधान्य देते.
खेळण्यासाठी खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रोटीनची गरज असते. त्यामुळे आहारात कसलीही तडजोड केली जात नाही, असं डॉक्टरांचं मत आहे.
रविवारी सायना आवडीचे पदार्थ खाते. यामध्ये पराठा, नान, पनीर बटर या पदार्थांचा समावेश असतो.
सायंकाळी सरावापूर्वी आणि सरावानंतर सायना पुन्हा प्रोटीन शेक घेते.
सायनाच्या रात्रीच्या जेवनात एक पोळी, दाळ आणि चिकनचा समावेश असतो.
सायनाच्या दुपारच्या जेवनात दोन पोळ्या, दाळ, उकडलेलं चिकन आणि लस्सी असते.
एक ग्लास दूध, अंडी आणि ब्रेड असा सायनाचा नाष्टा असतो. सकाळी सरावापूर्वी आणि सरावानंतर सायना प्रोटीन शेक घेते.
सायनाच्या जेवनात चिकन नियमित असतं.
सायना नेहमी 2500 कॅलरीज तर स्पर्धेच्या काळात 5000 कॅलरीज एवढा आहार घेते.
जिंकल्यानंतरचं सेलिब्रेशन सायना आईस्क्रिम खाऊन करते. याचा उल्लेख तिने कपिल शर्माच्या शोमध्येही केला होता.
स्पर्धेच्या काळात सायना नेहमीपेक्षा दुप्पट आहार घेते. जास्तीत जास्त कॅलरी मिळवण्यासाठी सायना जास्तीचा आहार घेते.
भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल जेवढी तिच्या खेळासाठी ओळखली जाते, तेवढीच ती तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. यामागे तिची डाएट हे मोठं रहस्य आहे.