एकट्याने फिरण्यासाठी खास पर्यटनस्थळं
पर्यटनासाठी एकट्याने जाणंही अनेकजण पसंत करतात. मात्र यावेळी सुरक्षिततेची खबरदारी घेतली जाते. तर आम्ही तुम्हाला अशी काही पर्यटनस्थळं सूचवणार आहोत, जिथे तुम्ही एकट्याने जाऊ शकता, राहू शकता आणि पर्यटनाचा आनंद घेऊ शकता...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलडाख (जम्मू-काश्मीर) – भारतातील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या लडाखमध्ये दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात. इथले स्थानिक पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. त्यामुळे एकट्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना काहीच त्रास होत नाही.
कसौल (हिमाचल प्रदेश) – भारतासह परदेशातील पर्यटकांच्याही आकर्षणाचं केंद्र असलेलं कसौल अत्यंत सुंदर ठिकाण आहे. इथल्या निसर्गात शांतता आहे. ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठीही इथे दूरदूरहून पर्यटक येत असतात. महिलांसाठी एक सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणूनही कसौलकडे पाहिले जाते.
दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) – भारतात सर्वात सुंदर अशा ठिकाणांपैकी एक म्हणजे दार्जिलिंग. इथले स्थानिक पर्यटकांचा आदर तर करतातच, मात्र गरजेला मदतीलाही धावून येतात. दार्जिलिंगमध्ये अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, त्यासाठी इथे गाईडची नक्कीच मदत घ्या.
कुर्ग (कर्नाटक) – भारतातील ‘मिनी-स्कॉटलँड’ म्हणून कुर्गची ओळख आहे. मैत्रीपूर्ण संवाद आणि वागणूक, ही इथल्या स्थानिकांची खास ओळख आहे. महिला असो वा इतर कुणीही, सर्वांच्या मदतीला स्वत:हून पुढे इथे लोक येताना दिसतात. त्यामुळे कुणी एकट्याने इथे पर्यटनाला आल्यास कोणत्याच अडचणी येत नाहीत.
भूतान – लाखो पर्यटक दरवर्षी भूतानमध्ये येतात. एक सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून भूतानची ओळख आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -