सचिनचा सुपरफॅन सुधीरकुमार गौतम धोनीच्या घरी
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2018 10:21 AM (IST)
1
आयपीएलमध्ये विजय मिळवल्यानंतर धोनी सध्या रांचीमध्ये काही निवांत क्षण घालवत आहे.
2
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे चाहते, किंबहुना भक्त जगभरात आहेत. मात्र सचिनचा सुपरफॅन सुधीर कुमार गौतमचा हात कोणीच धरु शकणार नाही.
3
सचिनचा हा चाहता चक्क चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या घरी गेला होता.
4
सुधीरकुमारने धोनी कुटुंबासोबत लंच घेतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
5
धोनीच्या फार्महाऊसवर सुधीर कुमार गौतमला लंचसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.