'भारतरत्न' घडवणारा 'भीष्माचार्य' हरपला
गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिनने आपले गुरु आचरेकर सरांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या भेटीचे फोटो शेअर केले होते. आचरेकर सर, तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी इतका मोठा पल्ला गाठूच शकलो नसतो. आपल्या गुरुंना विसरु नका, त्यांचा आशीर्वाद घ्या. असं सचिनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआचरेकर सरांचा जन्म 1932 साली झाला. वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे 1943 सालापासून त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, मात्र क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द अधिक गाजली.
रमाकांत आचरेकरांच्या निधनाबद्दल बीसीसीआयने ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे. आचरेकरांनी केवळ उत्तम क्रिकेटपटूच तयार केले नाहीत, तर त्यांना माणूस म्हणूनही घडवलं, या शब्दात बीसीसीआयने आदरांजली वाहिली आहे.
क्रिकेट प्रशिक्षक म्हणून 1990 साली त्यांचा 'द्रोणाचार्य' पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना 2003 मध्ये जाहीर झाला होता. 2010 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना 'पद्मश्री' प्रदान करुन गौरवण्यात आलं होतं.
आचरेकर सरांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, संजय बांगर, बलविंदर संधू, रमेश पोवार यासारखे अनेक खेळाडू घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरुन योगदान दिलं.
वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमाकांत आचरेकरांना आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास राहत्या घरातच ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
आचरेकर सरांचा जन्म 1932 साली झाला. वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे 1943 सालापासून त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, मात्र क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द अधिक गाजली.
रमाकांत आचरेकरांना पद्मश्री, द्रोणाचार्य यासारख्या पुरस्कारांनी केंद्र सरकारने सन्मानित केलं होतं.
क्रिकेटचे भीष्माचार्य आणि सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं. ह्रदयविकाराच्या धक्क्याने आचरेकर सरांची प्राणज्योत मालवली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -