अर्जुन तेंडुलकरची वांद्रे परिसरात साफसफाई
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सर्वांनी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात साफसफाई केली. प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपलं घर समजून स्वच्छ करावं, असं आवाहन राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने केलं.
मुलगा अर्जुनसह सचिनने युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत आज पहाटे पाच वाजता हाती झाडू घेऊन स्वच्छता केली.
मोदींनी आपल्या वाढदिनी म्हणजेच 17 सप्टेंबरला, देशातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. इतकंच नाही तर मोदींनी देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही पत्र लिहून ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलासह सहभाग घेतला.
त्यानुसार सचिन तेंडुलकरने आज या अभियानात हजेरी लावली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -