सचिन तेंडुलकरने गोव्यात अनुभवला बॅड रोड बडीजचा थरार
दक्षिण गोव्यातील केपे येथील पठारावर नैसर्गिक ट्रॅकवर सचिन कार घेऊन उतरला आणि त्याने आपले लक्ष्य साध्य करुन सगळ्यांना चकीत केलं.
सचिनने बॅड रोड बडीजशी संवाद साधताना बॅड रोड बडीज हे चांगले चालक असल्याचे सांगितले.
एका चीरेखाणीत खास नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खड्ड्यात कार उतरवून ती बाहेर काढण्याचा अनुभव ग्रेट असल्याचं सचिननं म्हटलं.
सचिनने आपली ऑफ रोड रेसिंगमध्ये कार चालवण्याची हौस विदेशात भागवली होती. देशात पहिल्यांदाच ऑफ रोड रेसिंगसाठी मैदानात उतरला.
गोव्यात यापूर्वी कार्ट रेसिंग ट्रॅकवर सचिन दिसला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला मास्टर ब्लास्टर सध्या ऑफ रोड कार रेसिंगचा आनंद लुटताना दिसत आहे.
गोव्यात रविवारी अपोलो टायर्सतर्फे आयोजित बॅड रोड बडीजच्या समारोप सोहळ्याला सचिनने हजेरी लावली. त्यावेळी सचिनने मैदानात उतरुन खेळात सहभागीही झाला.