बॉक्स ऑफिसवर 'रुस्तम'चा धुमाकूळ

खिलाडी अक्षय कुमारच्या बहु प्रतिक्षीत 'रुस्तम' सिनेमाने आज बॉक्स ऑफिसवर धडक दिली आहे. चाहत्यांनी बॉक्स ऑफिसवर 'रुस्तम'चं खास स्टाईलमध्ये स्वागत केलं.
'रुस्तम' देशभरातील 2317 स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. तर वर्ल्डवाईड 550 पेक्षा अधिक स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे.
रुस्तम पहिल्या दिवशी किती गल्ला जमवतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अक्षय कुमारचा एअरलिफ्टनंतर या वर्षातील ग्रँड ओपनिंग मिळवणारा हा दुसरा सिनेमा आहे.
तिकीटबारीवर 'रुस्तम'च बाजी मारणार, असं बोललं जात आहे.
प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी 'रुस्तम'ला शानदार पसंती दिली आहे.
बॉक्स ऑफिसवर आज 'रुस्तम' आणि हृतिक रोशनचा 'मोहेंजोदरो' दोन्ही सिनेमे रिलीज झाले आहेत.
खिलाडी अक्षय कुमारच्या बहु प्रतिक्षीत 'रुस्तम' सिनेमाने आज बॉक्स ऑफिसवर धडक दिली आहे. चाहत्यांनी बॉक्स ऑफिसवर 'रुस्तम'चं खास स्टाईलमध्ये स्वागत केलं.