धोनीच्या मॅचविनिंग खेळीत अनेक विक्रमांना गवसणी
धोनीने पुण्याला चौकार ठोकून विजय मिळवून दिला. आयपीएलमध्ये चौकाराने विजय मिळवून देण्याची कामगिरी धोनीने दुसऱ्यांदा केली आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमातही धोनीने पुण्याला अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत विजय मिळवून दिला होता.
आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक सरासरी असणारा धोनी दुसरा फलंदाज आहे. धावांचा पाठलाग करताना धोनीची सरासरी 58.28 एवढी आहे, तर ख्रिस गेलची सरासरी 69.88 आहे.
61 धावांच्या खेळीसोबत धोनी सामनावीराचाही मानकरी ठरला. हा त्याचा आयपीएलमधला 13 वा सामनावीराचा पुरस्कार आहे. धोनीने या सामनावीराच्या पुरस्कारानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी साधली. त्याच्या पुढे आता फक्त ख्रिस गेल, पठाण, एबी डिव्हीलियर्स, सुरेश रैना आणि डेव्हिड वॉर्नर आहेत.
या विजयानं धोनीची मॅचफिनिशर म्हणून क्षमता अजूनही कायम आहे यावर शिक्कामोर्तब झालं. शिवाय त्याने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली.
महेंद्रसिंग धोनीनं सिद्धार्थ कौलच्या अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून पुण्याला आयपीएलच्या सामन्यात हैदराबादवर एक रोमांचक विजय मिळवून दिला. धोनीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंटनं बलाढ्य सनरायझर्स हैदराबादला सहा विकेट्स राखून हरवलं.