खराब कामगिरीनंतर रोहित शर्मा ट्विटरवर ट्रोल
'जर मला 4 डाव खेळायला मिळाले तर मी रोहित पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा करेन.' असं जनक देसाई यानं ट्विटरवर म्हटलं आहे.
दुसऱ्या एका पेजवर असं म्हटलं आहे की, 'रोहित फक्त दोन कंडिशन्समध्ये तिसरी कसोटी खेळू शकतो. एक म्हणजे जर त्यानं विराटला सांगितलं की, ही माझी शेवटची कसोटी असेल. किंवा दुसऱ्या डावात मॅचविनिंग खेळी खेळल्यास.'
रोहित शर्मा नावानं तयार करण्यात आलेल्या या पेजवर असं म्हटलं आहे की, 'जर उदय चोप्रा कोणत्याही अॅक्टिंगशिवाय धूम सीरीजमध्ये कायम आहे तर रोहित कसोटी संघात असण्याबाबत का प्रश्न विचारले जातात?'
द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला एका मोठ्या भागीदारीची गरज असताना धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा अवघ्या 10 धावांवर बाद झाला. पहिल्या कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावातही तो सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे आता सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.