मुंबईकर रोहित शर्माचं शानदार शतक, टीम इंडियाने इतिहास रचला
एबीपी माझा वेब टीम | 14 Feb 2018 11:54 AM (IST)
1
रोहितने शिखर धवनच्या साथीने 48 धावांची सलामी दिली. मग त्याने विराट कोहलीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची आणि श्रेयस अय्यरच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली.
2
रोहितने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं सतरावं शतक झळकावलं.
3
रोहितने 126 चेंडूंमधली 115 धावांची खेळी अकरा चौकार आणि चार षटकारांनी सजवली.
4
रोहितच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकांत सात बाद 274 धावांचीच मजल मारली.
5
भारताकडून रोहित शर्माने खणखणीत शतक झळकावलं.
6
विराट कोहलीच्या टीम इंडियाने पोर्ट एलिझाबेथची पाचवी वन डे जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला.