रोहित शर्माकडून क्रिकेटच्या ‘दादा’शी बरोबरी
सर्वात जलद 8000 धावा करण्याचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने 175 डावात 8000 धावा पूर्ण केल्या आहेत.
रोहित शर्मानं 206 वन डे सामन्यात आठ हजार धावांचा टप्पा गाठला. त्यानं आजवरच्या कारकीर्दीत 47.39 च्या सरासरीनं 8010 धावांचा रतीब घातला आहे. त्यात तीन द्विशतकांसह 22 शतकं आणि 41 अर्धशतकांचा समावेश आहे.
टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मानं वन डे क्रिकेटमध्ये आठ हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा रोहित हा भारताचा आजवरचा तिसरा फलंदाज ठरला.
कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार स्पिनर अॅडम झॅम्पाने 10 षटकांत भारताच्या तीन महत्त्वाच्या विकेट झटकल्या. त्यात रोहित शर्माच्या विकेटचाही समावेश आहे.
दिल्लीच्या निर्णायक वन डेत टीम इंडियाचा 35 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिका 3-2 ने जिंकली आहे.
रोहितने 200 डावात 8000 धावा पूर्ण केल्या आहेत तर रोहितबरोबरच गांगुलीनेही 200 डावात 8000 धावा पूर्ण आहेत.