आयपीएलमध्ये 3 हजार धावा, रोहित शर्माचा नवा विक्रम
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. सचिनच्या नावावर आयपीएलमध्ये 2334 धावा आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंतिम सामना रविवारी बंगळुरुत खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबईसमोर रायझिंग पुणे सुपरजाएंटचं आव्हान असेल. क्वालीफायर वन सामन्यात मुंबईवर पुण्याने मात केली होती.
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा 3 हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा ठोकणारा एकमेव फलंदाज ठरला आहे.
या सामन्यात रोहित शर्माने 26 धावांचं योगदान दिलं. ज्यासोबत त्याने एका विक्रमालाही गवसणी घातली.
2327 धावांसह कायरन पोलार्ड या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सने शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर एकतर्फी विजय मिळवला. कोलकात्यावर सहा विकेट्स राखून मात करत मुंबईने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. (सर्व फोटो : IPL(BCCI)
शुक्रवारी झालेल्या बंगळुरुतील सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी अगदी योग्य ठरवत कोलकात्याला केवळ 107 धावांवरच रोखलं. त्यानंतर मुंबईने 14.3 षटकातच विजय मिळवला.
रोहित शर्मानंतर या यादीत अंबाती रायडूचा क्रमांक लागतो. त्याने 2402 धावा केल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -