किनारपट्टीवरील खाद्यसंस्कृतीची चंगळ, रोस्ट अँड कोस्ट फूड फेस्ट
मुंबईत अंधेरीतल्या कोहिनूर कॉन्टीनेंटलमधील सॉलिटेअर रेस्टॉरंटमध्ये रोस्ट अँड कोस्ट या फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी सुप्रसिद्ध शेफ सतीश अरोरा यांच्या हस्ते महोत्सवाचं उदघाटन झालं असून 25 तारखेपर्यंत फेस्ट चालणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे 'स्पीन द व्हील' खेळून बिलात सवलत मिळवता येईल किंवा गुडी बॅग, बिअर, मॉकटेल, कॉकटेल, बेकरी हॅंपर आणि एका बुफेवर 25, 50, 75 ते 100 टक्क्यांपर्यंत सवलतही मिळवता येईल.
लाईव्ह ऑर्केस्ट्रामुळे तुमच्या डिनरची रंगत आणखीनच वाढते
वेज आणि नॉनवेज सूपचे पर्याय असून चिंबोरीचं सूप हे ट्राय केलंच पाहिजे
सळी चिकन ही पारसी पद्धतीची हटके रेसिपी तुम्ही खाऊ शकता. बटाट्याच्या सळ्यांनी ही वैशिष्ट्यपूर्ण डिश सजली आहे
सुक्या मासळीची आवड असलेल्यानी सोडेभात चुकवता कामा नये
हल्ली बहुतेक लग्नांमध्ये डोकावणारा गुजराती उंधियो खाल, तर बोटं चाटत राहाल
शाकाहारींसाठी वेज डमडम हा पालक आणि बटाट्याचा एक चविष्ट पदार्थ चाखता येईल. तर चेनार दालना हा बंगाली किनारपट्टीचा पदार्थही इथे पाहायला मिळतो.
पदार्थ मातीच्या भांड्यात बुफे पद्धतीने मांडले आहेत. गंमत म्हणजे, मेन्यू मधील एकही पदार्थ यू ट्यूबवर किंवा इंटरनेटवर सापडणार नाही कारण मुलांनी वेगळी वाट चोखाळत आपल्या आजी-आजोबांची मदत घेत, त्यांच्या काळातील पारंपरिक चवीचे पदार्थ तयार केले आहेत.
गरमागरम पदार्थ खाता यावेत यासाठी खास सोय आहे. दर तीन दिवसांनी हा मेन्यू बदलणार आहे.
वेज स्टार्टर्समध्ये तुम्हाला फणसाचा चक्काकुरा वडा, mangalorian पट्टी समोसा असे पदार्थ चाखता येतील, तर नॉनवेजमध्ये पोहा भुजिंग, भुजलेलं पापलेट अशा रेसिपी खाता येतील.
या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे पदार्थ शिजवण्यापासून ते सर्व्ह करणं अशी सर्व जबाबदारी कोहिनूर हॉटेल management चे विद्यार्थी पार पाडणार आहेत. रोस्ट अँड कोस्ट या संकल्पनेअंतर्गत भारताच्या पूर्व ते पश्चिम सागर किनारपट्टीवरील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -