कसोटी कारकिर्द षटकारानं सुरु करणारा रिषभ पहिला भारतीय खेळाडू
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रिषभ 22 धावांवर खेळत होता. आज म्हणजे दुसऱ्या दिवशी रिषभकडून दमदार खेळीची अपेक्षा असणार आहे, जेणेकरून भारताची सामन्यावरची पकड आणखी मजबूत होऊ शकेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिषभ 77व्या ओव्हरमध्ये फलंदाजीला मैदानात उतरला. आदिल रशीद त्यावेळी गोलंदाजी करत होता. रशीदचा पहिला चेंडू रिषभने आरामात खेळला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूंवर पुढे येऊन षटकार लगावला.
कसोटी क्रिकेटमध्ये षटकार लगावत सुरुवात करणारा रिषभ पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकाराने आपलं खातं खोलणारा रिषभ 12वा खेळाडू ठरला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत रिषभ पंतला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणातचं रिषभने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पहिल्या दिवशी विराट आणि रहाणे यांच्या खेळीने सर्वांना प्रभावित केलं. मात्र आणखी एक खेळाडूने स्वत:कडे सर्वांचं लक्ष खेचलं. त्यांच नाव आहे रिषभ पंत.
भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकीय खेळीने पहिल्या दिवशी भारताने 307/6 धावसंख्या उभी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -