भारताची रौप्यराणी... पीव्ही सिंधूचं मायदेशी जंगी स्वागत!
या सामन्यात सिंधूला पराभव स्वीकारावा लागला असला तरी तिने रौप्यपदकाची कमाई करत नवा इतिहास रचला आहे.
पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत वर्ल्ड नंबर वन कॅरोलिना मरिनशी मुकाबला केला.
पीव्ही सिंधूने अक्षयकुमारचा ‘रुस्तम’ पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सिंधूचा हैदराबादी बिर्याणीवर ताव मारण्याचाही मनसुबा आहे.
तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास करुन मुंबईकरांची निलांबरी सिंधूच्या स्वागतासाठी हैदराबादेत दाखल झाली आहे.
दोघांच्या स्वागतासाठी तेलंगण सरकारने जय्यत तयारी केली असून हैदराबाद विमानतळापासूनच सिंधू आणि गोपीचंद यांची विजयी मिरवणूक काढण्यात येत आहे.
ओपन डेकची सुविधा असलेली निलांबरी रविवारी सकाळीच हैदराबादमध्ये दाखल झाली. पीव्ही सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद हे आजच भारतात परतले. त्यानंतर हैदराबादमध्ये त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात येत आहे.
मायदेशी परतल्यावर सिंधूच्या स्वागताचा मान मुंबईतल्या बेस्टच्या निलांबरी बसला मिळाला आहे.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या पीव्ही सिंधूवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.