आर्चीचा 'दुर्गावतार'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'सैराट' चित्रपटामधून आपल्या अभिनयाने केवळ महाराष्ट्रच नाही तर देश परदेशातील रसिकांची मनं जिंकणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु पहिल्यांदाच एका वेगळ्या रुपात दिसणार आहे.
पाहा आणखी फोटो
स्त्री शक्तीचा आणि तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करणाऱ्या झी मराठीच्या ‘उंच माझा झोका पुरस्कार’ सोहळ्यात रिंकूच्या नृत्याची ही अदा बघायला मिळणार आहे. ज्यात ती ग्रामीण ढंगाच्या वेशभूषेत आणि दुर्गावतारात दिसणार आहे.
या प्रत्येक ठिकाणी मात्र सैराटमधील गाणे किंवा त्यातील संवाद याच गोष्टी मुख्यत्वे बघायला मिळत होत्या. आता पहिल्यांदाच आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु एक आगळा वेगळा परफॉर्मन्स करताना बघायला मिळणार आहे.
हिंदी असो की मराठी वाहिन्यांवरील रिअॅलिटी शो या सर्वच ठिकाणी या जोडीने लावलेली उपस्थिती प्रेक्षकांना मोहवून टाकणारी होती.
'सैराट' चित्रपटानंतर सर्वत्र बोलबाला झाला आर्ची आणि परश्या या मुख्य जोडीचा. या जोडीने सर्वच प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं.
यामध्ये रिंकूने ‘मी रात टाकली’, ‘चिंब पावसाने रान झालं आबादानी’ आणि ‘तू गं दुर्गा तू भवानी’ या गाण्यांवर नृत्याचा ठेका धरला.
झी मराठीच्या 'उंच माझा झोका' पुरस्कार सोहळ्यात रिंकुच्या नृत्याची वेगळी झलक येत्या रविवारी 28 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता बघायला मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -