अखेर 251 रुपयांच्या 'फ्रीडम' स्मार्टफोनच्या विक्रीचा मुहूर्त ठरला!
या वर्षाच्या सुरुवातीलाच हा फोन लाँच करण्यात आला होता. त्यानंतर हा फोन वादात सापडल्यामुळे विक्री रोखण्यात आली होती.
रिंगिंग बेल कंपनीने काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोनची एका वेबसाईटद्वारे ऑनलाईन बुकींग सुरु केली होती. हा फोन जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा केला होता.
ज्या ग्राहकांनी कॅश ऑन डिलीव्हरी प्रमाणे हा फोन बुक केला होता, त्यांना या फोनची डिलीव्हरी केली जाणार आहे.
ज्या ग्राहकांनी या फोनचं बुकींग केलं होतं, त्यांना विक्री सुरु करण्यात येणार आहे, असं कंपनीचे संचालक मोहित गोयल यांनी सांगितलं.
जगातील सर्वात स्वस्त फोन तयार केल्यामुळे कंपनी वादात सापडली होती. तसंच हा फोन देशभर चर्चेचा विषय झाला होता.
रिंगिंग बेल कंपनीचा बहुचर्चित 'फ्रिडम 251' हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन 28 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचं कंपनीने जाहिर केलं आहे.