या बाबतीत रिद्धीमान साहाने धोनीलाही मागे टाकलं!
धोनीने साल 2012-13 मध्ये 24 जणांना तंबूत पाठवलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधर्मशाला कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने 115 धावांवरच 6 विकेट (दु. 3.21 वाजेपर्यंत) गमावल्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ शंभर धावांच्या आतच तंबूत धाडला.
भारताचा पहिला डाव 332 धावांवर आटोपला. त्यानंतर खेळण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला 10 धावांवरच उमेश यादवने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या रुपाने धक्का दिला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने स्टीव्ह स्मिथला माघारी पाठवलं.
या यादीत सय्यद किरमानी यांचा अव्वल क्रमांक लागतो. त्यांनी 1979-80 या मोसमात 35 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं.
भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांच्या धुवॉधार कामगिरी दरम्यानच विकेटकीपर रिद्धीमान साहानेही नवा विक्रम नोंदवला.
कसोटी क्रिकेटमध्ये एकाच मोसमात (2016/17) 26 जणांना माघारी धाडत त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर धोनीलाही मागे टाकलं आहे.
ग्लेन मॅक्सवेल आणि पीटर हॅण्ड्सकोम्ब यांनी चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही भागीदारी तोडण्यातही भारतीय गोलंदाजांना यश आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -