Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
या अटी पाहून जिओ फोन मागवल्याचा पश्चाताप होईल!
लोकेशन सेटिंग नेहमी चालू ठेवावी लागणार- जिओ फोन वापरत असाल तर कंपनीला तुम्ही कुठे आहात हे नेहमी माहित असेल. कारण लोकेशन संबंधित नोटिफिकेशन आणि माहिती देण्यासाठी तुम्हाला लोकेशन सेटिंग नेहमी चालू ठेवावी लागणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोनमध्ये कोणतीही छेडछाड चालणार नाही- जिओ फोनमध्ये ग्राहकांना कोणतीही छेडछाड करता येणार नाही. सॉफ्टवेअर बदलणं, सिम अनलॉक करणं, हे बेकायदेशीर असेल. कंपनी भविष्यात दुसऱ्या नेटवर्कसाठी सपोर्टची अपडेट देऊ शकते.
फोनचे मालक तुम्ही नाही- फोन खरेदी करताना 1500 रुपये देऊन, दर वर्षाला 1500 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतरही तुम्ही तुमच्या फोनचे मालक नसाल. कारण हा फोन तुम्हाला परत करायचा आहे. हा फोन विकण्याचे किंवा दुसऱ्य़ा व्यक्तीला वापरण्यासाठी देण्याचे अधिकार तुमच्याकडे नसतील. कंपनी आणि सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसारच या फोनचा वापर करता येईल.
ग्राहकांनी 12-14 महिने म्हणजे एका वर्षानंतर फोन परत केला तर त्यांना जिओकडून 500 रुपये परत मिळतील. 24-36 महिन्यांमध्ये हा फोन परत केल्यास 1000 रुपये मिळतील. 36 महिन्यांनंतर म्हणजे तीन वर्षांनंतर फोन परत केला तर 1500 रुपये परत मिळतील.
तीन वर्षांच्या आत फोन परत केल्यास जीएसटी भरा- जिओने फोनच्या रिटर्न-रिफंड पॉलिसीमध्ये बदल केला आहे. निश्चित केलेल्या तीन वर्षांच्या आतही ग्राहक हा फोन परत करु शकतात. मात्र त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. एका वर्षातच हा फोन परत केल्यास ग्राहकांना पैसे परत मिळणार नाहीत. याउलट 1500 रुपये आणि जीएसटी भरावा लागेल.
सिम बदलता येणार नाही- जिओ फोनमध्ये एकच इनबिल्ट सिम असेल, जे लॉक केलेलं राहिल. त्यामुळे तुम्हाला दुसरं सिम यामध्ये वापरता येणार नाही.
... तर एक रुपयाही परत मिळणार नाही- तीन वर्षांनंतर फोन परत करुन 1500 रुपये ग्राहकांना मिळवता येतील. मात्र तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांच्या आत फोन परत न केल्यास अनामत रक्कम जप्त केली जाईल. म्हणजेच ग्राहकांना एक रुपयाही मिळणार नाही.
दरवर्षी 1500 रुपयांचा रिचार्ज करा : या फोनची किंमत शून्य रुपये असेल आणि अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागतील, असं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. तीन वर्षात हे पैसे फोन परत करुन ग्राहकांना मिळतील. मात्र या तीन वर्षांच्या काळात ग्राहकांना दरवर्षी 1500 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल, असं त्यावेळी सांगण्यात आलं नव्हतं.
मुंबई : रिलायन्स जिओच्या बहुप्रतिक्षीत फोनची शिपिंग रविवारपासून सुरु करण्यात आली आहे. 1500 रुपये अनामत रक्कम ठेवून खरेदी केलेल्या या फोनची ग्राहकांना मोठी उत्सुकता आहे. मात्र त्यापूर्वी या फोनविषयीच्या अशा काही अटी समोर आल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला जिओ फोन मागवल्याचा पश्चाताप होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -