आता रिलायन्स LYF स्मार्टफोन, जिओफाय ऑनलाईन खरेदी करा!
Lyf स्मार्टफोनमध्ये सध्या Lyf वॉटर, Lyf वॉटर 8, Lyf अर्थ 1 हे स्मार्टफोन निवडण्यात आले आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे 7 हजार 999, 8 हजार 999 आणि 19 हजार 399 एवढी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानंतर रिलायन्सने पुन्हा एक नवी ऑफर आणली आहे. रिलायन्स LYF सीरिजच्या सर्व स्मार्टफोनसोबत आता Jio.com या वेबसाईटवरुन जिओफाय हॉटस्पॉट खरेदी करता येणार आहे.
ज्या ग्राहकांच्या घरात एकापेक्षा अधिक स्मार्टफोन युझर्स आहेत, त्यांच्यासाठी जिओफाय हॉटस्पॉट फायदेशीर आहे. या स्मार्टफोनवर एकाच वेळी हॉटस्पॉटद्वारे अनेक स्मार्टफोनवर 4 G इंटरनेटचा वापर केला जाऊ शकतो.
रिलायन्स जिओच्या वेलकम ऑफरला ग्राहकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर जिओने ही ऑफर 'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरमध्ये बदलत ग्राहकांना नव्या वर्षाची भेट दिली.
जिओफाय हॉटस्पॉटची किंमत सध्या एक हजार 999 रुपये आहे. यामध्ये Oled डिस्प्ले आणि 2600mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ऑर्डर दिल्यानंतर डिलीव्हरी 4 ते 5 दिवसात ग्राहकाला मिळेल, असं कंपनीचं म्हणणं आहे. पूर्वी ग्राहकांना हे फोन्स आणि जिओफाय फ्लिपकार्ट किंवा रिलायन्स स्टोअर्समध्ये जाऊन खरेदी करावे लागत होते.
'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरनुसार जिओच्या ग्राहकांना आता 31 मार्च 2017 पर्यंत मोफत इंटरनेट डेटा आणि अनलिमिटेड मोफत व्हॉईस कॉलिंग सेवेचा लाभ मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -