नव्या वर्षात रिलायन्स जिओची नवी ऑफर

जिओने वेलकम ऑफरला 1 जानेवारीपासून नव्या रुपात सादर केलंय. ज्यानुसार ग्राहकांना आता 4 GB ऐवजी 1 GB डेटा मिळेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्नॅपडीलची होम डिलीव्हरी सेवा सध्या काही प्रमुख शहरांमध्येच सुरु आहे.

स्नॅपडीलवर ग्राहकांना यासाठी आपला पत्ता, संपर्क आणि इतर माहिती द्यावी लागेल.
'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरनुसार जिओ युझर्सना आता 31 मार्च 2017 पर्यंत रोज 1 GB 4G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळेल. दिवसभरात 1 GB डेटा वापरल्यानंतर 128Kbps या स्पीडने डेटा मिळेल.
दरम्यान जिओचं सिम खरेदी करायचं असल्यास आता स्नॅपडील होम डिलीव्हरी करणार आहे. 'हॅप्पी न्यू ईयर' ऑफरसह हे सिम मिळेल.
आतापार्यंत जिओच्या युझर्सना रोज 4 GB मोफत डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा होती. मात्र यात आता बदल करण्यात आला आहे.
जिओ युझर्सना या ऑफरनुसार रोज 1 GB डेटा मोफत मिळणार आहे. शिवाय रोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा आनंदही घेता येईल.
31 डिसेंबरला रिलायन्स जिओची 'वेलकम ऑफर' संपल्यानंतर 1 जानेवारीपासून 'हॅप्पी न्यू ईयर' ऑफर सुरु झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -