तीन महिने मोफत अनलिमिटेड डेटा, रिलायन्स जिओची नवी सेवा
दरम्यान जिओने या सेवेबाबात अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. रिलायन्स जिओ लवकरच स्वस्त दरांमध्ये फीचर फोनही उपलब्ध करुन देणार आहे. ज्यांची किंमत 1 हजार रुपयांपेक्षाही कमी असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र इंस्टॉलेशन चार्ज आणि राऊटरसाठी साडे चार हजार रुपये मोजावे लागतील. तीन महिन्यांनंतर प्लॅन कसे असतील, याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
लाँचिंग ऑफरनुसार तीन महिन्यांसाठी मोफत हायस्पीड डेटा मिळणार आहे.
मात्र सध्या 70 ते 100Mbps एवढंच स्पीड मिळत आहे.
'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये ही सेवा सुरु झाली आहे. या भागातील काही इमारतींमध्ये युझर्स या सेवेचा लाभ घेत आहे.
सप्टेंबर 2015 मध्ये जिओकडून 'फायबर टू दी होम' (FTTH) या सेवेची चाचणी सुरु करत 1GBps या स्पीडने डेटा देण्याची घोषणा करण्यात आली होती. हीच सेवा आता सुरु झाली असल्याचं बोललं जात आहे.
रिलायन्स जिओने आता ब्रॉडबँड सेवेत नवं पाऊल ठेवलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -