जिओ फोनचे पैसे आता तीन वर्षांच्या आतही मिळवू शकता
जिओ फोन शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागांमध्ये लवकर पोहोचवला जाणार आहे.
जिओ फोनची शिपिंग रविवारपासून सुरु झाली आहे. येत्या 15 दिवसात 60 लाख जिओ फोनची शिपिंग करण्याचं ध्येय कंपनीने ठेवलं आहे.
फोन खरेदी करताना 1500 रुपये द्यावे लागतील आणि तीन वर्षांनी हे पैसे परत मिळतील.
जिओ फोन हा शून्य रुपयांमध्ये ग्राहकांना दिला जाईल. फक्त अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागतील, जे परत मिळतील, असं रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी फोन लाँच करताना 21 जुलै रोजी म्हटलं होतं.
36 महिन्यांनंतर म्हणजे तीन वर्षांनंतर फोन परत केला तर 1500 रुपये परत मिळतील.
24-36 महिन्यांमध्ये हा फोन परत केल्यास 1000 रुपये मिळतील.
ग्राहकांनी 12-14 महिने म्हणजे एका वर्षानंतर फोन परत केला तर त्यांना जिओकडून 500 रुपये परत मिळतील.
एका वर्षातच हा फोन परत केल्यास ग्राहकांना पैसे परत मिळणार नाहीत. याउलट 1500 रुपये आणि जीएसटी भरावा लागेल.
जिओने फोनच्या रिटर्न-रिफंड पॉलिसीमध्ये बदल केल्याचीही माहिती आहे. निश्चित केलेल्या तीन वर्षांच्या आतही ग्राहक हा फोन परत करु शकतात. मात्र त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.