स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, लाल किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त
कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 50 कंपनी फोर्सशिवाय पॅरा मिलिट्री फोर्स आणि एनएसजी कमांडो आणि जवळपास 15 हजार जवान 15 ऑगस्टच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. (फोटो : एपी)
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेक सरकारी इमारती आणि गैर सरकारी इमरातींना तिरंग्यात सजवण्यात आलं आहे. (फोटो : एपी)
दिल्ली पोलिसांनी 150 पेक्षा जास्त काईट कॅचर्सही पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान एक पंतत त्यांच्या खुप जवळ आली होती. (फोटो : एपी)
संपूर्ण परिसरात 1000हून जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 250 सीसीटीव्ही कॅमेरे लाल किल्ला परिसरात लावण्यात आले आहेत. (फोटो : एपी)
महिला कमांडोपासून शार्फ शूटर्सपर्यंत सर्वं याठिकाणी उपस्थित राहणार आहे. थ्री लेयर सिक्युरिटी ठेवण्यात आली आहे. दिल्ली पोलीस, पॅरामिलिट्री फोर्स आणि एनएसजी कमांडो सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. (फोटो : एपी)
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि लाल किल्ला परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. (फोटो : एपी)
भारत 72व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यास सज्ज झाला आहे. बुधवारी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे तिरंगा फडकवण्यात येईल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून भाषण करतील. (फोटो : एपी)